आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Muscat Pressure Of Newspapers Will Not Be Tolerated; I Will Ask The Government To Answer In The Convention: Darekar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निषेध:वृत्तपत्रांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाहीच; अधिवेशनात सरकारला जाब विचारू : दरेकर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीवर औरंगाबादमध्ये प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांचा रविवारी सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला. प्रशासनाच्या या दडपशाहीविराेधात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे या नेत्यांनी सांगितले.

यासंदर्भात भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. प्रशासन मात्र आकडे लपवण्याचा खेळ खेळत आहे. प्रशासनाचा हा भंडाफोड अनेक ठिकाणी भाजप करत आहे. औरंगाबादमध्ये दै. दिव्य मराठीने प्रशासनाचा गैरकारभार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे इगो दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी खोटी बातमी असल्याचे सांगत गुन्हे दाखल करणे अत्यंत निंदनीय प्रकार आहे.’ ‘या सर्व प्रकरणाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. तसेच, या प्रकरणाचा जाब आम्ही ३ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आघाडी सरकारला नक्की विचारू, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

ही तर अघोषित आणीबाणी : डॉ सहस्रबुद्धे
अाैरंगाबाद जिल्ह्यात काेराेना िवषाणूचे रुग्ण अाणि मृत्यू वाढतच असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर दै. दिव्य मराठीच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला. माध्यमाच्या मुस्कटदाबीचा रविवारी अकाेल्यात सामाजिक, राजकीय, पत्रकार संघटनांसह सर्वच स्तरातून निषेध नाेंदवण्यात अाला. हा गुन्हा मागे घेऊन दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाईची करण्याची मागणी हाेत अाहे. प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी केली.

बुलडाण्यात पत्रकारांकडून अाैरंगाबाद प्रशासनाचा निषेध
आरोग्य यंत्रणा बेजबाबदारपणे असून, याचा अनुभव एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून आपल्याला आला आहे. अशा बेजबाबदार यंत्रणेविरुद्ध दै. दिव्य मराठीने आवाज उठवला अन् तो दाबण्याचा प्रयत्न केला. या मुस्कटदाबीचा निषेध मराठी पत्रकार संघ व सर्व पत्रकारांच्या वतीने मी करतो, अशी प्रतिक्रिया मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी दिली.

चौथ्या आधार स्तंभाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्व पत्रकार सोबत राहु, असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अरुण जैन यांनी केले. दिव्य मराठी वरील गुन्ह्याचा निषेध करत आम्ही सोबत राहु, असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष लहाने म्हणाले.

‘दिव्य मराठी’मध्ये ‘२०६ नागरिकांचे मारेकरी कोण? “नापासांची फौज: निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. बातम्या चुकीच्या असल्याचे कारण सांगत दिव्य मराठीचे संपादक, प्रकाशक आणि संबंधित वार्ताहरांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. हे सत्य माध्यमांनी मांडायचे नाही का? हा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासन नापास झालेले नसेल तर मृतांचा आकडा आणि बाधितांची संख्या सातत्याने कशी वाढत चालली आहे? याचाही खुलासा जिल्हा प्रशासनाने केला पाहिजे. माध्यमे जनतेचा आवाज आहेत. दिव्य मराठीचा ही आवाज दाबण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून होत आहे. त्याचा निषेध आज रविवार, २८ जून रोजी पत्रकार भवन बुलडाणा येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन करत करण्यात आला. सोबतच यावेळी क्रेडिट ॲसेस ग्रामीण या कंपनीच्या वतीने पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले.

यावेळी प्रेस कौन्सिलचे वतीने राजेश डिडोळकर यांनीही दिव्य मराठीने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांबाबत प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्हया बाबत निषेध व्यक्त करत ही मुस्कटदाबी सहन करणार नाही, असे मत मांडले. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वतीने वसीम शेख, दीपक मोरे यांनीही निषेध व्यक्त केला.

लाेकशाही मूल्यांची गळचेपी : केंद्रीय मंत्री आठवले
‘वर्तमानपत्रे जागल्याचे काम करत असतात. चुकीची बातमी प्रसिद्ध झाली असे वाटल्यास प्रशासन खुलासा देऊ शकते. थेट गुन्हे दाखल करणे हा लोकशाही मूल्यांची गळचेपी करण्याचा प्रकार आहे,’ अशी भूमिका रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

पोलिसांनी गुन्हे मागे घेऊन चूक सुधारावी : कपिल पाटील
‘वृत्तपत्रे ही आरसा आहेत. त्यात आपला चेहरा गढूळ दिसला म्हणून चिडून आरसा फोडायचा नसतो. उलट चेहऱ्यावरची धूळ झटकली पाहिजे. दोन स्तंभांत संघर्ष उद्भवता कामा नये. औरंगाबादचे पोलिस प्रशासन गुन्हे मागे घेऊन आपली चूक दुरुस्त करेल,’ असे लोकभारतीचे आमदार कपिल पाटील म्हणाले.

अत्यंत निंदनीय व निषेधार्ह प्रकार
कोरोना प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यास सर्व स्तरावर सपशेल अपयशी ठरलेले ठाकरे सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी पत्रकार व प्रसार माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटाच लावला आहे. प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी व गळचेपी करण्याचेच काम सुरू आहे. दै. दिव्य मराठीचे संपादक, प्रकाशक, पत्रकार यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाला. अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे. आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, भाजपा

लाेकशााहीचा गळ घोटण्याचे काम
कोरोना साथीमध्ये प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. दै. दिव्यमराठीसारख्या निपक्ष वृत्तपत्राने प्रशासनाच्या व शासनाच्या बेदखल वृत्तीवर आपल्या लेखणीद्वारे वास्तविकता मांडली म्हणून दिव्य मराठीच्या संपादकवर गुन्हे दाखल करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. दैनिकांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे असेच म्हणावे लागेल. ओमप्रकाश स. शेटे, माजी प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष

प्रसारमाध्यमांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाहीच
सध्या केरोनाच्या परिस्थितीमध्ये वृत्तपत्र आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित आहे. वर्तमानपत्रे जबाबदारीचे भान ठेवून वार्तांकन करतात. त्यांच्याकडून चूक झाल्यास स्पष्टीकरण देणे तसेच प्रेस काैन्सिलसारखी माध्यमे आहेत. मात्र, थेट गुन्हे दाखल करण्याची बाब दडपशाहीच म्हणावी लागेल. याचा निषेध आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. तसेच याप्ररकणी येत्या पावसाळी अधिवेशनात आम्ही आवाज उठवल्याशविाय राहणार नाही. राहुल ढिकले, भाजप आमदार

दै. दिव्य मराठीचे प्रमाणिकपणे काम
पारनेर | कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य जनतेसाठी काम करताना, त्यांना धीर देण्याचे काम करत असताना नोकरशाहीच्या आडमुठेपणाचा माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनांही अनुभव आला आहे. काेरोना संदर्भात वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेसमोर यावी, यासाठी दैनिक दिव्य मराठी प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे निषेधार्ह आहे. नीलेश लंके, आमदार

महाविकास आघाडी सरकारचा तानाशाही कारभार : सदाभाऊ खोत
‘कोरोना बळीचे आकडे राज्यात सर्वत्र दडवले जात आहेत, असा आरोप आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. औरंगाबदेत दिव्य मराठीवर गुन्हे दाखल होणे हे आघाडी सरकारचा कारभार तानाशाही पद्धतीने चालला असल्याचे निदर्शक आहे,असेही त्यांनी सांगितले.

वृत्तपत्रांची मुस्कटदाबी योग्य नाही : माकप नेते काॅ. अशोक ढवळे
सीपीएमचे नेते काॅ. अशोक ढवळे म्हणाले, साथीच्या काळात तरी सत्य लोकांच्या समोर आले पाहिजे. कुठल्याही प्रकारे कोणाकडूनही वृत्तपत्रांची मुस्कटदाबी होणे योग्य नाही. औरंगाबादमध्ये दैनिक दिव्य मराठीवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा प्रकार लोकशाहीच्या विरोधातले पाऊल आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे ढवळे यांनी स्पष्ट केले.

आैरंगाबाद शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. आपल्या अपयशाचे खापर आता जिल्हा प्रशासन माध्यमांवर फोडायला लागले आहे. ‘दै. दिव्य मराठी’ ने २०६ नागरिकांचे मारेकरी कोण? ’ असेे वृत्त प्रसिद्ध करताच अाैरंगाबादच्या पाेलिस प्रशासनाने ‘दिव्य मराठी’ विरोधात गुन्हा नोंदवला. या दडपशाहीचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात अाहे.

अकोल्यामध्ये अनेक संघटनांनी नोंदवला निषेध
दै. दिव्य मराठीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी प्रशासनावर टीका करताना एकूणच हा प्रकार निषेधार्ह असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...