आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur Patients Are Also Coming To Bed For Naxal Affected Gadchiroli; Cases Are Low, But Everyone Is Scared Of 20 21 Deaths Everyday; News And Live Updates

नक्षलग्रस्त जिल्ह्यात कोरोनामुळे हाल:अंत्यविधीसाठी 2,800 रुपयांचे लाकूड विकत घेतले, कुटुंब वाट पाहत बसले; 19 तास उलटले तरी हॉस्पिटल प्रशासनाकडून मृतदेह देण्यास नकार

गडचिरोली/चंद्रपूर9 महिन्यांपूर्वीलेखक: मनीषा भल्ला
  • कॉपी लिंक
  • राज्यात गेल्या 24 तासांत 67,123 नवे रुग्ण

महाराष्ट्र राज्य देशात नवीन रुग्ण संख्या आढळण्याच्या यादीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. राज्यातील परिस्थिती कोरोना महामारीमुळे हाताबाहेर जाताना दिसत आहे. रुग्णांना बेड्स, व्हेंटिलेटर आणि अन्य औषधांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यात रोज सक्रीय रुग्णांची संख्या 50-60 हजारांवर जात आहे. दरम्यान, राज्यातील नक्षलग्रस्त भागातील जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असूनदेखील लोकांना उपचारसाठी वणवण भटकावे लागत आहे. विशेष म्हणजे येथे उपचार घेण्यासाठी नागपूर, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि स‍िमेलगतच्या जिल्ह्यातील लोक तेथे बेड्स उपलब्ध नसल्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येत आहे.

गडचिरोली सामान्य जिल्हा रुग्णालयात कोरोना मृत व्यक्तींचा शव देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून मोठा विलंब केला जात आहे. यामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबातील लोकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गडचिरोली येथीलच शाम बाबूच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे संध्याकाळी 5 वाजता मृत्यू होतो. परंतु, 12 तास उलटल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह मिळत नाही. कुटुंबांकडून अंत्यविधी करण्यासाठी 2800 रुपयांचे लाकूड विकत घेतले होते. अंत्यविधीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून हॉस्पिटल प्रशासनाने 19 तास मृत व्यक्तीचे शव दिले नाही.

शाम बाबू पुढे म्हणाले की, मृतदेह कोण देईल? कधी देईल, कोणाशी बोलावे लागेल हेदेखील कोणी सांगत नसल्याचे ते म्हणाले. मृत व्यक्तींच्या कुटुंबांतील लोकांना शव घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे लागत आहे. कोरोनाच्या नवीन संक्रमनामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील परिस्थिती खराब होत आहे.

11.66 लाख लोकसंख्या, रोज 1,400 चाचणी
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या 11 लाख 66 हजार 494 असून येथे दररोज सुमारे 1 हजार 400 लोकांची चाचणी केली जाते. दरम्यान, यामध्ये 195 ते 200 लोक रोज कोरोनाबाधीत होत आहे. जिल्ह्यात सध्याघडीला 12 हजार 940 लोक कोरोना महामारीच्या विळ्याख्यात सापडले असून यात सक्रीय रुग्णांचा आकडा 2 हजार 162 आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 67,123 नवे रुग्ण
राज्यात शनिवारी 67,123 नवे रुग्ण आढळले असून 419 मृत्यूंची नोंद झाली. गेल्या 24 तासांमध्ये 56,783 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 37,70,707 झाली असून 30,61,174 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 81.18 झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...