आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारूसोबत व्हायग्राच्या 2 गोळ्या घेतल्यामुळे एका 41 व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधानुसार, डॉक्टरांनी हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे.
AIIMS च्या 6 डॉक्टरांच्या पथकाने हा शोधनिबंध गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जमा केला होता. तो चालू आठवड्यात ऑनलाइन पब्लिश करण्यात आला. तो प्रिंट फॉर्मॅटमध्ये प्रकाशित करण्यापूर्वी त्याचा आढावा घेऊन योग्य ते बदल केले जातील.
वाचा या व्यक्तीची संपूर्ण केस स्टडी...
डॉक्टरांनी या केस स्टडीमध्ये सांगितले की, हा व्यक्ती आपल्या मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये थांबला होता. तिथे त्याने मद्यपान करून सिल्डेनाफिल 50mg च्या 2 गोळ्या घेतल्या. हे कॉम्पोझिशन व्हायग्रा म्हणून बाजारात विकले जाते. डॉक्टरांच्या मते, या व्यक्तीची कोणतीही वैद्यकीय व सर्जिकल हिस्ट्रीही नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. प्रथम त्याला उलट्या झाल्या. त्याच्या मित्राने त्याला डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला दिला. पण त्याने आपली यापूर्वीही अशी प्रकृती बिघडल्याचे सांगत, डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला.
काही वेळानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्टडीनुसार, या व्यक्तीचा मृत्यू सेरीब्रोवास्कुलर हेमोरेजमुळे झाला. या स्थितीत मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.
पोस्टमॉटर्ममध्ये मेंदूत आढळली 300mg रक्ताची गुठळी
या व्यक्तीच्या पोस्टमॉर्टेममध्ये डॉक्टरांना त्याच्या मेंदूत 300mg रक्ताची गुठळी आढळली. उच्च रक्तदाबासह अल्कोहोल व ड्रग्जच्या मिश्रणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. डॉक्टरांनी स्टडीमध्ये लिहिले – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इरेक्टाइल डिसफंक्शन औषध घेणे धोकादायक ठरू शकते हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही हे दुर्मिळ प्रकरणाची केस स्टडी प्रकाशित करत आहोत.
तज्ज्ञांचा सल्ला - हार्ट पेशंटने घेऊ नये व्हायग्रा
या प्रकरणी गुडगावच्या आर्टेमिस हॉस्पिटलचे डॉ. पी. व्यंकट कृष्णन यांनी सांगितले की, व्हायग्रा घेणाऱ्या व्यक्तीला हृदयविकार नसावा. तसेच तो हृदयाशी संबंधित औषधोपचारही घेत नसावा. यासंबंधीचा इशारा या गोळ्यांच्या पाकिटावर लिहिलेला असतो. त्यामुळे हे औषध घेण्यापूर्वी व्यक्तीने त्याच्या हृदयाची स्थिती तपासली पाहिजे. व्हायग्रा लिहून देणाऱ्या डॉक्टरांनीही रुग्णाच्या हृदयाची स्थिती पाहून औषध लिहून द्यावे.
ते म्हणाले की, आमच्या मते नागपुरातील व्यक्तीच्या मृत्यूचा दारूशी कोणताही संबंध नसावा. हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. पण अशी प्रकरणे घडलेच नाहीत असेही नाही. हृदयरोगींना व्हायग्रा घेण्याचा जास्त धोका असतो. एकाच वेळी 2 गोळ्या घेणेही धोकादायक आहे. विशेष म्हणजे आम्ही फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नियमितपणे 2 व्हायग्रा घेण्याचा सल्ला देतो. त्यामुळे व्हायग्राच्या 2 गोळ्या घेणे प्राणघातक असते असेही नाही.
एखाद्या व्यक्तीला व्हायग्राचे सेवन केल्यावर अस्वस्थ वाटत असेल, तब्येत बिघडली असेल, छातीला घाम येत असेल किंवा चांगले वाटत नसेल तर त्याने वेळ न दवडता डॉकट्रांकडे जावे. या स्थितीत घरगुती उपचार कामाला येणार नाहीत.
व्हायग्रा म्हणजे काय? त्याविषयी कोणती काळजी घ्यावी?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.