आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची मागणी:राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांच्या कार्यप्रणालीवर नाना पाटोले यांना संशय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाचे निकाल वारंवार राज्य सरकारच्या विरोधात का येत आहे, यावर शंका निर्माण करत राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्या कार्यप्रणालीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. निवडणुकांबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपा सरकारच्या काळापासून अ‍ॅडव्होकेट जनरल हे कुंभकोनीच कायम असल्याने निर्णय विरोधात जात असल्याचे यावेळी म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळापासून कुंभकोणीच अ‍ॅडव्होकेट जनरल- नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2017 मध्ये होऊ दिल्या नाही तेव्हा अ‍ॅडवोकेट जनरल हे कुंभकोणी होते. आजही तेच या पदावर असून वारंवार ओबीसी अरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे राज्य सरकारच्या विरोधात येत असल्याची शंका सध्या उपस्थित झाली आहे. यासंदर्भातील सर्व गोष्टी सरकारला लक्षात आणून देणे दायित्व आहे. यासंदर्भात जो संशय आमच्या मनात आहे तो आम्ही व्यक्त केला आहे. असंही पटोले म्हणाले.

कोणाला ठेवावे बदलावे हा सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर अ‍ॅडव्होकेट जनरल कुंभकोणीला बदलवण्यात का आले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, याबदद्ल मला माहीत नाही. ते सरकारचे अधिकार आहे. कुंभकोणी बद्दल सरकारचा निर्णय चुकला की नाही, त्याबद्दल मी आज काही वक्तव्य करू शकत नाही, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...