आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीलच्या ट्रकमध्ये गांजा:नांदेडमध्ये गांजाची 48 पोती जप्त, मुंबईतील NCB पथकाची कारवाई; आंतरराष्ट्रीय बाजारात 8 कोटी किंमत असल्याचा अंदाज

शरद काटकर | नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्हा नांदेडमध्ये गांजाची तस्करी करणारा एक ट्रक पकडण्यात आला आहे. विशाखापट्टनम येथून महाराष्ट्रात येत असताना नायगाव येथे NCB चे पथक आणि पोलिसांनी सोमवारी पहाटे हा ट्रक अडवला. त्यातून एक दोन नव्हे तर तब्बल 48 पोती भरून गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून सविस्तर चौकशी सुरू आहे.

मुंबईच्या NCB पथकाने नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटे ही धाडसी कारवाई केली. या 48 पोत्यांमध्ये तब्बल 11 क्विंटल 75 किलो गांजा सापडला आहे. सदर ट्रक गांजा घेवून विशाखापट्टनम येथून जळगावकडे जात असतानाच पकडण्यात आले आहे. या प्रकरणात ट्रक क्रमांक MH 26 AD 2165 आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सविस्तर तपास सुरू आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 7 ते 8 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या पथकात एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णापारमदरेकर यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...