आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांवरील हल्ला प्रकरण:400 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 20 जणांना अटक; हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक

नांदेड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुद्वारा परिसरातच मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली होती

नांदेडमधील 'होला-मोहल्ला' मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात 400 हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 लोकांना अटकही करण्यात आली आहे. या हल्ल्यात 4 पोलिसांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वांवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'होला-मोहल्ला' मिरवणूक रोखण्यासाठी पोलिस गेले होते तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दंड्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. समाजकंटकांनी एसपी आणि डीएसपीच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या.

जमाव अचानक गुरुद्वाऱ्यात बाहेर निघाला आणि पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडण्यात आले. हा जमाव तैनात केलेल्या पोलिसांवर तुटून पडला. या हिंसेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

गुरुद्वारा परिसरातच मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली होती
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) निसार तांबोळी म्हणाले की, होला-मोहल्लाची मिरवणूक नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा शीखांद्वारे काढली जाते. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या आजारामुळे ही मिरवणूक काढू दिली गेली नव्हती. याची माहिती गुरुद्वारा समितीला देण्यात आली होती. त्यांनी आमच्या सूचनांचे पालन करून गुरुद्वाराच्या आवारात कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले होते.

रस्त्यावर मिरवणूक काढण्यासाठी अडून बसले
DIG निसार तांबोळी यांनी सांगितले की सूचना असूनही सायंकाळी चार वाजता निशान साहिब यांना गुरुद्वारा गेटवर आणण्यात आले. पोलिसांनी नकार दिल्यावर शीख तरुणांनी वाद घातला आणि अचानक 400 हून अधिक लोक हातात शस्त्रे घेऊन पोलिसांवर तुटून पडले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक आहे. जमावाने पोलिसांच्या सहा वाहनांचेही नुकसान केल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात 400 हून अधिक लोकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 324, 188, 269 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...