आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या; मागच्या वर्षी याच महिन्यात जिल्हाध्यक्षानेही घेतला होता गळफास

नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मनसे शहराध्यक्ष सुनील इरावार(डावीकडून) आणि संभाजी जाधव(उजवीकडून) - Divya Marathi
मनसे शहराध्यक्ष सुनील इरावार(डावीकडून) आणि संभाजी जाधव(उजवीकडून)
  • मागच्या वर्षी या महिन्यात जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव यांनी गळफास घेतला होता

नांदेडच्या मनसे शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदेडचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. विशेष म्हणजे, मागच्या वर्षी याच महिन्यात नांदेडच्या जिल्हाध्यक्षानेही आत्महत्या केली होती.

जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी काल (शनिवार 15 ऑगस्ट) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहीले, 'राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे.'

मागच्या वर्षी याच महिन्यात जिल्हाध्यक्षानेही आत्महत्या केली होती
मागच्या वर्षीय या महिन्यात नांदेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांनीही आपल्या राहत्या घरात गळफासघेऊन आत्महत्या केली होती. संभाजी जाधव हे राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांपैकी होते.

बातम्या आणखी आहेत...