आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​नांदेड:मालगाडीचे डबे पटरीवरून घसरले; तीन तास थांबवली देवगिरी एक्सप्रेस, सुदैवाने कुठलीही हानी नाही

​​​​​​​नांदेड (शरद काटकर )4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले

मुखेड ते उमरी रेल्वे स्टेशन दरम्यान शिवनगावजवळ मालगाडीचे डबे पटरीवरून घसरल्याची घटना गुरुवारी (ता.२३) सकाळी दहा वाजता घडली. दरम्यान, काही वेळानंतर हे काम सुरळीत करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.

मालगाडीचे डबे घसरल्याने या मार्गावरून जाणारी मुंबई सिकंदराबाद (०७०५७) देवगिरी एक्सप्रेसला ही ३ तास थांबवण्यात येऊन ताशी १-३ किमी वेगाने सिकंदराबादकडे सोडण्यात आले. प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले. दुपारच्या वेळी साधारण १२ ते १ पर्यंत रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरुवात झाल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...