आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का:माजी खासदार खतगावकर यांचा भाजपला राम राम; पुन्हा काँग्रेसमध्‍ये करणार प्रवेश, अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपला दिली सोडचिठ्ठी

प्रतिनिधी | नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाध‍िकारशाहीला कंटाळून भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्याने आपण आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंबंधी त्यांनी दिलेल्या निवेदनात माजी खासदार खतगावकर म्हटले, भाजपची जिल्ह्यात जोमाने वाटचाल सुरु असताना श‍िवसेनेत कार्यरत असलेल्या चिखलीकरांना भाजपत घेण्यात आले आण‍ि त्यानंतर निष्ठावंतांवर अन्यायाची मालिका सुरु केली. अवघा भाजप चिखलीकरांच्या दावणीला बांधला गेला, निष्ठावंत व पक्षासाठी झोकून काम करणाऱ्या मंडळींना बेदखल करण्याचे काम खासदार चिखलीकर यांनी जिल्हयात केल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार चिखलीकरांच्या कार्यपद्धती अनेकवेळा राज्य नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व चिखलीकरांना ताकद देवून अन्यायाला खतपाणी घातले गेले.

दरम्यान, देगलूर-बिलोली मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी उमेदवार देतांना माझे मत विचारात घेणे अपेक्षीत होते. परंतू, खासदार चिखलीकरांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे उमेदवार खासदार चिखलीकरांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माझ्यावर फोडायचे असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसून लागले होते. कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय सहन न झाल्याने अनेकांनी मला दुसरा पर्याय निवडण्याविषयी सुचविले होते. त्यामुळेच मी आणि माझ्या सर्व प्रमुख पदाधिका-यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देवून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सरजितसिंघ गील, बाबाराव पाटील भाले, राजू गदीगुडे, रवि पाटील खतगावकर, आनंदराव बिराजदार, दिपक पावडे आदीं काँग्रेसमध्‍ये प्रवेश करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...