आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देगलूर बिलोली पोटनिवडणूक:कोण आहेत देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे जितेश अंतापूरकर? जाणून घ्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे सुभाष साबणे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी झाली. मतमोजणीच्या एकूण 30 टप्प्यांपैकी 27 टप्प्यांची मतमोजणी झाली. अंतापूरकर हे 41933 मतांनी विजयी झाले.

कोण आहेत जितेश अंतापूरकर?
देगलूर-बिलोली हा विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यातील आहे. या मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले. यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघाची ही पोटनिवडणूक झाली. जितेश अंतापूरकर हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र आहेत.

कोण होते रावसाहेब अंतापूरकर?
सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

कोरोनाच्या काळातही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. अगदी शेती-बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...