आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:‘ती चिमुकली मामा म्हणून जवळ येत होती; पण तू क्रूरपणे तिला 47 जखमा केल्यास, तुला फाशी दिल्याशिवाय पर्याय नाही’

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास मृत्युदंड सुनावताना जजनी सुनावले

नांदेड जिल्ह्यातील मौजे दिवशी बु. (ता.भोकर) येथे २० जानेवारी रोजी एका पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी बाबूराव उकंडू सांगेरावला (३५) मंगळवारी भोकर जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ‘तू जे कृत्य केले ते अत्यंत घाणेरडे, माणुसकीला काळिमा फासणारे आहे. ती मुलगी तुला मामा म्हणून जवळ येत होती. तिच्याबद्दल जराही दया माया आली नाही. तू ४७ ठिकाणी तिच्या अंगावर जखमा केल्या. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार करून निर्दयीपणे कोवळ्या बालिकेचा खून केलास. त्यासाठी तुला फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही,’ असे सुनावत न्यायाधीशांनी मृत्युदंड ठाेठावला.

केवळ ४० दिवसांत या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. मौजे दिवशी बुद्रुक येथील सालगडी बाबूरावने २० जानेवारीला चिमुकीलीला शेतात नेत अत्याचार केला होता. नराधमाने ४७ ठिकाणी चावा घेऊन चिमुकलीच्या अंगाचे लचके तोडत हात-पाय मोडले होते. याप्रकरणी २१ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक विकास पाटील व सहकाऱ्यांंनी तपास पूर्ण केला. दोषारोप दाखल केले. आरोपीस २२ मार्च रोजी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सर्वच गुन्ह्यांत दोषी ठरवले. आरोपीच्या बाजूने अ‍ॅड. जे. जे. जाधव यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासले. शासकीय अभियोक्ता रमेश राजूरकर व त्यांना सहायक म्हणून एस. के. कुलकर्णी व अ‍ॅड. शेख सलीम यांनी युक्तिवाद करून आरोपीस फाशीची मागणी केली.

४१ व्या दिवशी निकाल
गुन्ह्यातील सबळ पुरावे मिळवून २१ दिवसांच्या आत १० फेब्रुवारीला विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. स्पशेल पोक्सो केस ६/२०११ अन्वये भोकर न्यायालयात सुनावणी सुरू झाली. २२ फेब्रुवारीला आरोपीविरुद्ध आराेप लावण्यात आले. त्यानंतर एक मार्चपासून साक्षी पुराव्यास सुरुवात करून ४० दिवसांत सुनावणी पूर्ण झाली. दोषरोपपत्र दाखल झाल्याच्या ४१ व्या दिवशी २३ रोजी निकाल देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...