आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:दंगल प्रकरणातील 35 आरोपी अटकेत; तपासासाठी 10 पथके स्थापन, सुमारे 300 जणांवर गुन्हा

नांदेड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहरात शुक्रवारी (ता.१२) दुकानांची तोडफोड करत वाहनांवर दगडफेक करण्यात आली. दंगल घडवून आणणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी १० पोलिस पथके स्थापन केली आहेत. दरम्यान, या प्रकरणात विविध पोलिस ठाण्यांत सुमारे ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील ३५ आरोपींना अटकही झाली आहे.

त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले होते. शुक्रवारी दुपारी शिवाजीनगर, डॉक्टर लेन व देगलूर नाका परिसरात दगडफेक करून दुकानातील साहित्यांची व वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही वाहने जाळण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर, वजिराबाद, नांदेड ग्रामीण व इतवारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका
सामाजिक शांतता भंग करणारे, समाजविघातक व्हिडिओ, पोस्ट, संदेश, सोशल मीडियावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. व्हॉट्सॲप वापरणारे, ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांनी विशेषत: ग्रुप अॅडमिनने आपापल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारीत होणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी. आक्षेपार्ह काही आढळल्यास जवळील ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन सायबर पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...