आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरही शातीर निघाले:सिसिटीव्हीत चेहरे दिसु नयेत म्हणून चक्क छत्री उघडून तोंड लपवत दोन दुकानात चोरी

दिंद्रुड / नागेश वक्रेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड गावातील घटना

गावात जळालेल्या ट्रान्सफार्मरमुळे पसरलेल्या अंधाराचा फायदा घेत चार चोरांनी मध्यरात्री दोन वाजता किराणा दुकानाचे गोडावऊन फोडले. आत प्रवेश केल्यावर सिसिटीव्ही कॅमेऱ्यात दिसले जावु नये म्हणून ओळख लपवण्यासाठी दोन चोरांनी चक्क सिसिटीव्ही कॅमेऱ्यासमोर छत्री उघडून तोंड लपवत चोरी केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे गणेश मायकर या व्यापाऱ्याचे गावातील व्यापार पेठेतील रस्त्यावर किराणा दुकानाचे गोडाऊन असुन मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या चार पैकी दोन चोरांनी आपण गोडावुन मधील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात दिसले जावु नये म्हणून एक शक्कल लढवली पावसामुळे बरोबर आणलेली छत्री उघडुन किराणा दुकानाच्या गोडाऊन मधील तेलाचे बॉक्स, गोडतेलाचे डबे, बिस्किट बॉक्स, हजार एकुण ५० हजार रूपयांचा किराणा माल लांबवल्याची घटना घडली. चोरीचा हा घटनाक्रम गोडाऊनमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दुसऱ्या घटनेत दिंद्रुड येथील देवदहिफळ रस्त्यावरील व्यापारी अविनाश पांचाळ यांच्या फरशीच्या दुकानाच्या पाठीमागील पत्र्याचे शेड उचकुन आत प्रवेश करत चोरांनी सुरूवातीला वीज पुरवठा बंद केला त्यांनतर दुकानातील एक एलईडी टीव्हीसह तिजोरीतील तीन हजार रूपये चोरांनी लांबवले आहेत. या प्रकरणात दिंद्रुड पोलिस दोन्ही दुकानादाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे, दरम्यान मंगळवारी दुपारी बीड येथील ठसे तज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली आहे.

चोरांनी घेतला अंधाराचा फायदा
दिंद्रुड येथे मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असुन पावसात अचानक वीज पुरवठा खंडीत होत असुन दोन दिवसांपासुन गावात ट्रान्सफार्मर जळाल्याने रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे. याच अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटना घडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...