आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन गप्पाटप्पांतून मुलांना बोलते करणाऱ्या संतोष राऊत सरांची “मन की बात’ पोहोचली पंतप्रधानांपर्यंत

नांदेड / शरद काटकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेडच्या सहशिक्षकाने लॉकडाऊनमध्ये 10 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना एकत्र जोडले

लॉकडाऊनमध्ये नांदेड जिल्ह्यातील सहशिक्षक संतोष मारुतीराव राऊत यांनी राज्यातील १० जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना एकत्र जोडून त्यांना मनमोकळे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांचे छंद व आवड वृद्धिंगत करण्यासाठीचा या उपक्रमाची पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. आजच्या (२५ जुलै) “मन की बात’मध्ये याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत.

संतोष हे नांदेड जिल्ह्यातील कारवाडी (ता.अर्धापूर) जि. प. शाळेत सहशिक्षक आहेत. लॉकडाऊनच्या काळात संतोष यांनी “मुलांशी गप्पा’ या कर्यक्रमाद्वारे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी उपक्रम सुरू केला. यात त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे आता मोठे विद्यार्थी लहानग्यांना मार्गदर्शन करतात. गेल्या ३७४ दिवसांपासून हा कार्यक्रम अविरत सुरू आहे. जागतिक कीर्तीचे शिक्षक डिसले सरांनीही संतोष यांच्याशी संवाद साधला आहे.

असा आहे उपक्रम : संतोष यांनी हा उपक्रम १३ जुलै २०२० मध्ये सुरू केला. आता विद्यार्थीच सकाळी ७.३० वाजता मीटिंग आयोजित करतात. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद व गुजरातमधून ४० वर विद्यार्थी सहभागी होतात. गप्पा मारत हळूहळू अभ्यासाकडे वळण्याचा प्रयत्न यात केला जातो. कंटाळा आला की विद्यार्थी नकाशात विविध देश, राज्य, जिल्हे शोधतात, बुद्धिबळ खेळतात. एखाद्या विषयावर १ पान लिहून उर्वरित मुलांना ते लिहिण्यास सांगितले जाते.

दर रविवारी पाहुणे मुलांच्या भेटीला
दररोज सायंकाळी मुलांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (डायट) लिंक पाठवली जाते. ती १५ दिवस चालते. पुणे, नाशिक येथील शिक्षकही जोडले जातात. तेही गीतगायन, अ‍ॅप कसे तयार करायचे याची माहिती मुलांना देतात. दर रविवारी “पाहुणे आपल्या भेटीला’ अंतर्गत गृह मंत्रालयाचे कक्षाधिकारी, वैमानिक, सैनिक, लेखक, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते, कलाकार, व्यावसायिक यांच्या भेटी व मुलाखती विद्यार्थ्यांसमवेत घेतल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...