आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:परिचिताला आधी फाेनवर विचारले, कुठे आहात? नंतर घर साफ करून काॅलवरच कळवले, तुमच्या घरी चोरी झाली

नांदेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संशय आणि श्वानाने माग काढल्यानंतर घटना उघडकीस, दाेघांना केली अटक

चाेरी केल्यानंतर कुठलाही पुरावा मागे राहू नये यासाठी गुन्हेगार शिताफीने घर साफ करतात. पण नांदेडच्या कंधार तालुक्यातील भेंडेवाडीत मात्र गावातील चाेरट्याने एका घराच्या मालकाला फाेन करून बाहेरगावी असल्याची खात्री केली नंतर त्यांच्या घरात चाेरी करून फाेनवरच चाेरी झाल्याची माहिती त्यांना दिली. कधीही फाेनवर न बाेलणारी व्यक्ती दाेनदा फाेन करते याचा संशय आला आणि पाेलिस तपासात श्वानाने चाेरट्यापर्यंत माग काढल्यानंतर हा अजब प्रकार उघड झाला. पाेलिसांनी गजानन गंगाराम गिते (३५) व अच्युत वैजनाथ लटपटे (२५, रा. दाेघेही भेंडेवाडी) या दाेघांना अटक केली.

भेंडेवाडीतील गजानन हे कुटुंबासह रविवारी (दि.३०) गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी येथे लग्नासाठी गेले हाेते. दुसऱ्या दिवशी त्यांनी नांदेडला मुक्काम केला. त्याच दरम्यान, गावातील लटपटेने फोन करून ‘आपण कुठे आहात?’ असे विचारले. नांदेडला आहे, असे कळताच त्याच रात्री गजानन ढाकणे यांच्या घरातील पाच तोळे सोने व एक लाख दहा हजार रुपयाची चोरी करून दुसऱ्या दिवशी गजानन ढाकणेला फोन करून तुमच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले. गजानन ढाकणे हा घरी आल्यानंतर चोरी झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यासाठी कंधार पोलिस ठाण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे, पोलिस उपनिरिक्षक सुभाष गंगलवाड, बीट जमादार सुभाष चोपडे यांनी केली.

नांदेड येथून घेतले ताब्यात
पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गजानन ढाकणे यांची विचारपूस केली असता ढाकणे यांनी मला अच्युतचा कधीही फोन येत नाही. त्यामुळे संशयाची सुई अच्युतकडे गेली. दरम्यान, त्याला नांदेड येथून ताब्यात घेतले. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान अच्युत जवळ जाऊन थांबले. न्यायालयाने तीन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...