आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियासमोर आले राणे:कोण शिवसेना? नारायण राणे तुम्हाला साधा माणूस वाटला काय? मी शिवसैनिकांना भीक घालत नाही! अटकेच्या शक्यतांवर राणेंची प्रतिक्रिया

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी कोणताही गुन्हा केला नाही, माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला का? याविषयी मला काही माहिती नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राणेंविरोधात अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी काढले आहे . त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते. उद्धव ठाकरे वादक्रस्त बोलतात, तेव्हा गुन्हा दाखल का झाली नाही? असा सवालही राणे यांनी केला आहे.

'मी शिवसैनिकांना भीक घालत नाही'
'माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी करायला घेतली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, आमचेही केंद्रात सरकार आहे. राज्य सरकारची उडी किती लांब जाते ते पाहूया.' अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

'मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभे राहावे. नोटीस आणि पत्रात यात फरक आहे. ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का आदेश काढायला? कमिशनर यांनी वक्तव्य तपासून पाहावे. मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन दगड मारून गेले हा पुरुषार्थ नाही. ते जे काय करत आहेत ते करू दे. तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही.

नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले. तसेच नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटताहेत.

बातम्या आणखी आहेत...