आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुतीसुमने:नारायण राणे महाराष्ट्रातील दबंग नेते, या स्वप्नपूर्तीचा आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय- देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मी नारायण राणेंचा संघर्ष खूप जवळून पाहिला आहे'

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या सिंधुर्गात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि इतर अनेक भाजप नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी नारायण राणेंचे तोंडभरुन कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, 'नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे.'

'नारायण राणेंचा संघर्ष मोठा'

सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'महाराष्ट्रातील दबंग नेता म्हणून नारायण राणेंना पाहिले जाते. एखादं स्वप्न पाहिल्यावर झोप विसरून नारायण राणे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. 650 हॉस्पिटल उभारणे हे खूप आव्हानात्मक आहे.'

'मी नारायण राणेंचा संघर्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तरतूदी असतात. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्षे वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले. या स्वप्नपूर्तीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर पाहतोय', असे फडणवीस म्हणाले.