आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज उद्घाटन:नारायण राणे अत्यंत हुशार राजकारणी, अमित शहा यांना बोलवून त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली- चंद्रकांत पाटील

सिंधुदुर्ग2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले

भाजप नेते नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या निवडीवर प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. त्यांनी आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी अमित शाह यांच्या रुपाने अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली.'

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 'नारायण राणे हे खूप हुशार राजकारणी आहेत. हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे', असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...