आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:'वरुण सरदेसाई सांभाळून बोल, आमच्याकडे तोंड बंद करण्याचे उपाय आहेत'; नारायण राणेंचा घणाघात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई शहर सुरक्षित नसल्याचे व्टीट केले होते. यानंतर शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली. त्यावर आता भाजप नेते नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ' तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोल', असा इशारा भाजप नेते नारायण राणे यांनी दिला.

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, 'शिवसेनेचा अन्याय पाहून सगळे गेलेत. शिवसेनेत आता नवे केलेक्टर ऑफिसर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे. वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर ज्या शब्दात टीका केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी', असे नारायण म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?

अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी लिहिले की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. " यानंतर अमृता फडणवीस यांनी आजही(दि.4) एक ट्वीट करुन सुशांतला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. अमृता यांनी एक शायरी ट्वीट केली आणि सोबत '#जय श्री राम #जस्टीस फॉर सुशांत #दिशा' असे लिहीले आहे.

वरुण सरदेसाई यांचे प्रत्युत्तर

वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. 'मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्योरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता ?? सोडून द्या की सिक्योरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!' अशा शब्दात सरदेसाई यांनी टीका केली होती.

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटरवरुन निशाना साधला होता. 'मुंबई पोलिसांवर आरोप करुन बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करु इच्छिते की, त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडावी. त्यांनी खासगी सुरक्षा संस्थेकडे जावे, जिथे त्यांना सुरक्षित वाटेल. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे लाजिरवाणे', अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...