आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...मध्ये बोलू नको!:नारायण राणेंनी चक्क फडणवीसांसमोरच प्रवीण दरेकरांना केले गप्प, अधिकाऱ्याशी बोलताना दरेकरांना म्हणाले - थांब रे... मध्ये बोलू नको!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दौऱ्या काढण्यावर पवारांनी काय सल्ला दिला होता?

राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पूरग्रस्त भागात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून दौऱ्यावर दौरे सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, नारायण राणे यांनी अधिकाऱ्याशी बोलताना मधातच बोलणाऱ्या प्रवीण दरेकरांना "थांब रे... मध्ये बोलू नको!" असे म्हणतं चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसमोरच गप्प केले आहे. त्यामुळे या व्हिडिओची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करत असताना राणे अधिकाऱ्यांशी बोलत होते.

घटना कशी घडली?
केंद्रीय मंत्री नारायण पूरग्रस्त भागातील पाहणी दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापत होते. दरम्यान, प्रवीण दरेकरांनी मधातच बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे हात दाखवत नारायण राणे यांनी "थांब रे... मध्ये बोलू नको!" असे म्हणत सर्वासमारे गप्प केले. तर संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी यावेळी केली.

ते म्हणाले की, तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता? काय चेष्टा समजली? एवढी लोक रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत... त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले आणि तुम्ही हसताय. दात काढताय? असे म्हणत अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. याच दरम्यान दरेकर मध्ये काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा वेळीच राणेंनी 'थांबरे.. मध्ये बोलू नको' असे म्हणत दरेकरांना चुप केले.

पवारांनी सल्ला दिला, दौरे करू नका
संकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कामात अडथळे येतात असे पवारांनी आपल्या अनुभवातून सांगितले. पवार म्हणाले, माझा पूर्वीचा अनुभव आहे. प्रामुख्याने लातूरच्या वेळी... अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते.

माझे आवाहन आहे, की असे दौरे टाळा. मी लातूरला असताना आम्ही सगळे कामात होतो. तेवढ्यात पंतप्रधान येत होते. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते, की 10 दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल. त्यामुळे त्यांना 10 दिवसांनंतर येण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना, आपण दौरे केले तेव्हाच अधिकारी कामाला लागतात असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...