आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खुले चॅलेंज:'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा', नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर 'प्रहार'

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेकाळी शिवसेनेत असलेले आणि सध्या भाजपमध्ये केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे नेहमीच शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र करत असतात. आता पुन्हा नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' असे थेट आव्हान राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आपल्या मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर टीका करत होती. आता त्याचा बदला काढण्यासाठी राणेंनी देखील आपल्या प्रहार या वृत्तपत्रातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 'हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा' या मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाणी प्रहार वाचा उद्याच्या अंकात असे सदर छापण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रहार वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर हा मथळा छापण्यात आला आहे. गुरुवारच्या अंकात राणे हे उद्धव ठाकरेंवर 'हार आणि प्रहार' या शिर्षकाखाली हल्लाबोल करणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा नुकताच पार पडला त्यात मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला होता. केंद्रीय तपास यंत्रणांचा बेकायदेशीर वापर भाजप करत असल्याचा आरोप ठाकरेंनी भाजपवर लगावला होता. त्यावर आता राणे मुख्यमंत्र्यांवर प्रहार करणार आहे. प्रहारच्या आजच्या अंकात याबाबत पुर्वकल्पना देण्यात आली आहे.

'शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय तपास यंत्रणांवर बेलगाम टीका करणाऱ्या, सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाची कास सोडलेल्या, ज्यांच्या मदतीनं पक्ष वाढवला त्या भाजपवर बेछूट आरोप करणाऱ्या आणि केंद्र सरकारकडे सतत झोळी पसरवून त्यांनाच दोष देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खणखणीत आणि घणाघाणी प्रहार, 'हार आणि प्रहार', उद्याच्या अंकात वाचा' असे प्रहारमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या उद्याच्या मुख्यमंत्र्यांवरील प्रहाराची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...