आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी 6.30 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. पण,या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी बंगालचे मुख्य सचिव सहभागी होतील. यापूर्वी 17 मार्चला झालेल्या बैठकीलाही ममता बॅनर्जी गैरहजर होत्या. बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीमुळे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्याचा परिणाम आता सरकारी कार्यक्रमांवरही दिसत आहे.
लसीकरणावर होईल चर्चा
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. यात त्यांनी अधिकाऱ्यांना कोरोना रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते. आज होणाऱ्या बैठकीत देशातील लसीकरणावरही चर्चा होऊ शकते.
लसीकरणावरुन राज्य VS केंद्र
महाराष्ट्राने केंद्राकडे लसीची कमतरता असल्याचे म्हटले आहे. तसेच, याच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आरोप लावला की, महाराष्ट्र सरकार आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे.
उद्धव ठाकरे मोदींसमोर ठेवू शकतात या चार मागण्या
1. दर रोज 6 लाखांपेक्षा जास्त लसींचा पुरवठा 2. रेमीडेसीवीरची किम्मत कमी केली जावी. 3. ऑक्सीजनचा पुरवठा वाढवला जावा. 4. खराब व्हेंटीलेटरसाठी तांत्रिक मदत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.