आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीत नवीन सेल:राष्ट्रवादी काँग्रेसने आज केली देशातील पहिल्या एल.जी.बी.टी. सेलची स्थापना

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलडीबीटी(लेसबियन, गे, बायसेक्शुअल, ट्रासजेंडर) समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज देशातील पहिल्या एल.जी.बी.टी. सेलची स्थापना केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या एलजीबीटी सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती केली.

याबाबत जयंत पाटील म्हणाले की, 'समाजातील एलजीबीटी लोक मुख्य प्रवाहात यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे याचा विचार करुन राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला. शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे', असे जयंत पाटील यांनी सांगितले.

'राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एल.जी.बी.टी. वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे', असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत- सुप्रिया सुळे

'राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला पक्ष आहे ज्याने युवती सेलची स्थापना केली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस एलजीबीटी विभाग स्थापन करणाराही देशातील पहिला पक्ष ठरलाय. आम्ही कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत, म्हणून या सेलची स्थापन केली आहे. या सेलच्या माध्यमातून एलजीबीटी समूहाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा उद्देश आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एलजीबीटी समूहाच्या प्रश्नांसाठी वेल्फेअर बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता, त्याबाबतही आगामी काळात पुढाकार घेणार,' अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

'महाराष्ट्रात एल.जी.बी.टी समूह 10-12% आहे. त्यांच्या प्रश्नांची दखल समाजाकडून घेतली जात नाही, मात्र या सेलच्या माध्यमातून आम्ही त्यांची दखल घेऊ, समानता, रोजगाराबाबत पुढाकार घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणू', असा विश्वास सेलच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...