आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बलात्कार:क्वारेंटाइन सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर आरोग्य कर्मचाऱ्याकडून बलात्कार; आरोपीला झाली कोरोनाची लागण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी मुंबईतील एका क्वारेंटाइन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेल पोलिसांनी पीडित महिलेच्या सांगण्यावरुन आयपीसी कलम 376 आणि 354 के अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा आरोग्य कर्मचारी असून, त्याच क्वारेंटाइन सेंटरमध्ये काम करत होता.

पनवेल पोलिस अधिकारी अशोक राजपूत यांनी सांगितले की, घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. बलात्कारानंतर महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाली. महिला या क्वारेंटाइन सेंटरमध्ये भरती होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपीने महिलेला बाथरुममध्ये नेले आणि तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपीची कोरोना चाचणी करण्यात आली, तो पॉझिटिव्ह निघाला. सध्या त्याला पोलिसांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे.