आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Navnit Rana Hanuman Chalisa Delhi | Rana Couple Will Recite Hanuman Chalisa In Delhi Today, 'Maha Aarti' For Liberation From Thackeray Government

राणा दाम्पत्याची आज दिल्लीत महाआरती:हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला आव्हान

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा असे, म्हणत खासदार नवनीत राणांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे.मुख्यमंत्र्यांची आज मुंबईत सभा होणार आहे, ते सभेची सुरुवात औरंगजेबाचे नाव घेऊन करणार का? असे म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना जनता धडा शिकवणार असून, औरंजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? असा सवाल देखील राणा दाम्पत्यांनी विचारला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विसरले असल्याचे देखील नवनीत राणा म्हणाले.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या दिल्लीत असून, त्यांनी आज दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. ठाकरे सरकारपासून मुक्तीसाठी ही महाआरती करत येत असल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितले. मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याच्या उद्देशाने आलेल्या राणा दाम्पत्यांना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणाने पतीसोबत थेट दिल्ली गाठली आणि तेव्हापासून दोघेही इथेच थांबले आहेत.

कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात आरती व पठण

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा आणि आरतीचे पठण केले. दोघेही आज सकाळी 8.30 वाजता त्यांच्या घरापासून पायी मंदिराकडे निघाले होते, घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हनुमानाचे मंदिर आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा पाठ करतील, असे राणा म्हणाले.

23 एप्रिल रोजी करण्यात आली होती अटक

राणा दाम्पत्य सध्या दिल्लीत असून आज ते हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा केल्यानंतर अखेर पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामिन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...