आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल देशमुखांना CBIची क्लिनचीट?:अनिल देशमुखांबबतचा अहवाल खरा की खोटा? सीबीआयने खुलासा करावा, नवाब मलिक यांची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देण्यात आल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. अशा प्रकारची कागदपत्रेही गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला सवाल केला आहे.

देशमुखांबाबत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने लवकरात लवकर करावा. ही सीबीआयची जबाबदारी आहे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.

सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो व्हायरल करण्यात आला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणि ही बातमी खोटी आहे याबाबतचा खुलासा सीबीआयने करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...