आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवडू ड्रग्स प्रकरण:एनबीसीने चौकशीचे थेट प्रक्षेपण करावे; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील एनसीबी चौकशीतून मिनिटा-मिनिटाची माहिती बाहेर येत असून ती प्रसारमाध्यमातून क्रिकेट कॉमेन्ट्रीसारखी ऐकविली जाणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. अशाच पद्धतीने चौकशी करायची असेल तर पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आपदा मे अवसर’ समजून आयपीएल प्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाच्या हक्काचे लिलावच करून टाका. त्यातून सरकारच्या तिजोरीत काही पैसा तरी येईल, असा उपरोधिक सल्ला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी रविवारी दिला.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, एनसीबी सध्या बॉलिवूडमधल्या कलाकारांची चौकशी करत आहे. या चौकशी संदर्भातील सर्व माहिती बाहेर येत असून त्यांना कोणते प्रश्न विचारले, किती प्रश्न विचारले, कोण रडले, अशी सर्वच माहिती बाहेर येत आहे. अशा चौकशीमुळे पुढच्या गुन्हेगारालाही कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आधीच तयारी करण्यास त्याला मदत होणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर पंतप्रधान केअर फंडात जमा झाली तेवढी रक्कम जमा झाली नाही तरी काहीतरी जमा होईलच. या सर्व प्रकरणांचा उपयोग भाजपला बिहारच्या निवडणुकीत प्रचार करण्यासही उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही मदत होईल त्यामुळे भाजपाचे आर्थिक आणिराजकीय दोन्ही हेतू साध्य होतील. सरकारचे अपयश लपवणे आणि मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा गैर मुद्द्यांचा गाजावाजा केल्यास भाजपला फायदा होतो. मुख्य समस्यांकडे जनता लक्ष देणार नाही, असे सावंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...