आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण:NCB ने दोन ड्रग तस्करांना घेतले ताब्यात, हिटलरच्या बायोग्राफीत लपवलेली LSD जप्त

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जप्त केलेले ड्रग्स यूरोपियन देशातून मागवण्यात आले होते

अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात NCB ने सोमवारी दोन ड्रग्स तस्करांना ताब्यात घेतले. मलाड, परेल आणि सांताक्रूजमध्ये छापेमारीनंतर NCB च्या पथाने मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले. तपासात समोर आले की, दोन्ही आरोपी बॉलिवूडमधील काही लोकांना ड्रग्स सप्लाय करायचे. यात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पकडलेल्या दोन आरोपींपैकी एकाची पोलिस विभागात निवड झाली होती.

हिटलरच्या बायोग्राफीमध्ये लपवले ड्रग

NCB हेड समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, LSD(ड्रग्सचा प्रकार) चे 80 blots हिटलरच्या बायोग्राफी(पुस्तक)मध्ये लपवण्यात आले होते. याला एका पार्सलमधून विले पार्लेच्या पोस्टऑफिसमध्ये पाठवण्यात आले होते. तपासात समोर आले की, हे ड्रग्स डार्कनेटद्वारे युरोपियन देशातून मागवले होते आणि पेमेंट क्रिप्टो करंसी म्हणजेच बिटकॉइनमधून केली होती.

बातम्या आणखी आहेत...