आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • NCP Chief Sharad Pawar And Chief Minister Uddhav Thackeray Discussed What Topics, The Chief Minister Himself Shared

नेत्यांमधील संवाद:राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये कोणत्या विषयांवर होते चर्चा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः केले शेअर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची नस ओळखणारा नेता अशी शरद पवारांची ओळख आहे. राजकारणाच वारं कोणत्या दिशेने वाहत आहे हे पवारांना चांगल्या प्रकारे कळतं. राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीचं नवं समिकरणं हे त्यांच्याच प्रयत्नांमुळे निर्माण झालं आहे. महाविकास आघाडींच सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शरद पवारांच मार्गदर्शन हे मोलाचं ठरलंय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग आहे. या काळात शरद पवारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे मार्गदर्शन मिळतं हे त्यांनी स्वतः सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

शरद पवारांसोबतच्या भेटीत काय होते चर्चा...

उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'त्यांच्या सोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा काही कामं घेऊन येतात असं अजिबात नाही. कधी कधी त्यांचा फोन येतो की, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळा मग सगळं जुळत असेल तर त्यांची आणि माझी भेट होते. भेटीत ते त्यांचे जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं…चीनचा विषय निघाला. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव…त्यांचा चीन दौरा…मग चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली… जुन्या त्यांच्या अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात.' अस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.