आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • NCP Chief Sharad Pawar Gets Vaccinated At Mumbai's JJ Hospital, Pawar Becomes First Politician From Maharashtra To Take Corona Vaccine

लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये घेतली कोरोना लस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना लस घेणारे शरद पवार राज्यातील पहिले नेते

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात 60 पेक्षा जास्त वय असलेले आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांसोबत त्यांची मुलगी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील होत्या. लसीकरणादरम्यान जे.जे. हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाणेदेखील पवारांसोबत उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवारांनी भारत बायोटेकची Covaxin दिली आहे.

कोरोना व्हॅक्सीन घेणारे राज्यातील पहिले नेते

आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्समध्ये लस घेतली. दरम्यान, शरद पवार राज्यातील पहिले कोरोना लस घेणारे नेते बनले आहेत.

बातम्या आणखी आहेत...