आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंवर कारवाईची मागणी:मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील 12.50 कोटी जनतेचा अपमान- आव्हाड, नवाब मलिकांकडूनही कारवाईची मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप, आमने-सामने आले आहेत.

शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. नारायण राणेंचे वक्तव्य हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. मुख्यमंत्री हे पद संविधानिक आहे. त्याचा अपमान हा 12.50 कोटी जनतेचा अपमान आहे, असे आव्हाड यांनी ट्वि असं आव्हाड यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक आक्रमकांचा पवित्रा

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणे म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर कुणी वागत असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नवाब मलिक यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणें यांच्या अकटेची मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...