आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:'अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, की पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही'- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गोपीचंद पडळकरांना ठेवणीतल्या अशा शिव्या देऊ, की रात्रभर झोप येणार नाही', असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. 'शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना', अशी वादग्रस्त टीका गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केली होती, त्या पार्श्वभूमिवर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी त्यांनी पडळकरांच्या वक्तव्यामागे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचा हात असल्याचाही आरोप केला.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, 'बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. या वक्तव्यांचे बोलवते धनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. हे सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी आता इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरू झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील', असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.

हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, 'एक दिवस आधी फडणवीसांनी पुण्यातील आपल्या मुलाखतीत शरद पवारांचा संदर्भ देणे आणि दुसऱ्याच दिवशी पडळकरांनी पवारांवर असे वक्तव्य करणे, हा योगायोग नाही. पडळकरांच्या वक्तव्यानंतर फडणवीस पडळकरांचे वक्तव्यं चुकीचे असल्याचे सांगतात. तसेच ते भावनेच्या भरात बोलल्याचे म्हणतात. चंद्रकांत पाटील त्यांच्याबाबत देखील अशी विधाने झाल्याचे सांगतात. मात्र, महाराष्ट्रात अशा प्रकारची विधाने कधीही झालेली नाहीत', असे मुश्रीफ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...