आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा आरोप:मोदींच्या वाढदिवशी विक्रम करण्यात यावा म्हणून 15-20 दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले- नवाब मलिक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा-वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आले हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले. यावर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जर पावणेतीन कोटी लसीकरण काल झाले तर आज आणि उद्या का नाही असा सवालही नवाब मलिक यांनी केला. जर पहिल्यांदा लसीकरण केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता मात्र एखाद्या व्यक्तीच्या 'महिमा' साठी अशाप्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...