आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मारहाण:गाडी जरा हळू चालवा, असे सांगितल्याच्या रागातून राष्ट्रवादीच्या आमदाराची शिपायाला बेदम मारहाण; अदखलपात्र गुन्हा दाखल

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. 'गाडी जरा हळू चालवा', असे सांगितल्यामुळे लहामटे यांनी ग्रामपंचायतीच्या शिपायाला बेदम मारहाण केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर असलेले रामदास बांडे(40) हे पायी चालत असताना आमदार किरण लहामटे यांच्या गाडीने त्यांना कट मारला. त्यावर रामदास बांडे यांनी ओरडून गाडी हळू चालवा, असे म्हटले. या गोष्टीचा राग आल्याने आमदार किरण लहामटे यांनी आपल्या गाडीतून उतरुन बांडे यांच्या छाती, पोटावर लाथा मारल्या. तसेच, मला ओळखत नाहीस का, असे म्हणत शिवीगाळही केली. यानंतर बांडे यांच्या तक्रारीवरुन राजूर पोलिस स्टेशनमध्ये कलम 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.