आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित पवारांना कोरोना:राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. रोहित पवार सध्या उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात झाले असून, संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देखील रोहित पवार यांनी केले आहे.

राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातील अनेक राजकीय मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. राज्यात आतापर्यंत 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते, त्यात आता आमदार रोहित पवारांची भर पडली आहे.

वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, के.सी. पाडवी, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह 10 मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. याशिवाय पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुजय विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...