आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध, दरवाढ रद्द करा अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महात्मा गांधी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

देशात इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी ता. २ दुपारी महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून दरवाढ रदद् न केल्यास आणखी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिला आहे.

येथील महात्मा गांधी चौकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, महिला आघाडीच्या पदाधिकारी सुमीत्रा टाले, संजय दराडे, ॲड. स्वप्नील गुंडेवार, बालाजी घुगे, संचित गुंडेवार, संतोष गुठ्ठे, मनोहर पोपळाईत, माधव कोरडे, केशव शांकट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. देशात खताची दरवाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत तर गॅससिलेंडरच्या दरवाढीने सर्व सामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यातच पेट्रोल व डिझेलच्या किंमतीने लिटरमागे शंभरी गाठली आहे. या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनता आर्थिक अडचणीत आली आहे. केंद्र शासनाने दरवाढ त्वरीत मागे घ्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...