आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोडे मारो आंदोलन:परभणीत प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

परभणी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथे शहरातील राष्ट्रवादी भवनसमोर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी बुधवार 15 सप्टेंबर रोजी भाजप नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्या आक्षेपार्ह्य वक्तव्याविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत दरेकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात संतप्त महिलांनी प्रवीण दरेकर यांनी अपशब्द वापरून महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी, महिलांचा अपमान केला आहे. दरेकर यांनी हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला होता, स्वतःचे घोटाळे केलेले पाप धुण्यासाठी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांचे पाप संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया देत प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात भावना नखाते, नंदा राठोड, संगीता डेकर, वनिता चव्हाण, संगीता भरसकर, रंजना हातागळे, मुमताज शेख, मैमुना बी शेख, सुमित्रा लझडे, जनाबाई वैरागड आदींनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...