आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाबरोबरच माकडताप रोगाचा सामना करत आहे. माकडतापाचे नव्याने ३५ रुग्ण आढळले आहेत. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू गोव्यातील बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये, तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सावी लोके यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्या वतीने ६ लाख ८७ हजार ६७९ लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यातील ३ हजार ७२९ लोकांना सर्दी व खोकला ही कोरोनाची असलेली लक्षणे आढळून आली. हे सर्व रुग्ण आता व्यवस्थित आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून या वेळी बैठकीत देण्यात आली. आतापर्यंत १२४ रुग्णांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. यातील ६९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर ५५ रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत १४४ रुग्णांचे कोरोना नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील एकच नमुना पॉझिटिव्ह आला होता. १०३ नमुने निगेटिव्ह आले असून ४० नमुने प्रलंबित आहेत, अशीही माहिती देण्यात आली.
माकडांमधून माणसात आलेला विचित्र आजार - डॉ. महेश खलिपे, आरोग्य अधिकारी
कॅसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) म्हणजेच माकडताप हा माकडांमधून माणसात आलेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका आणि बांदा या गोव्याच्या सीमावर्ती भागात या तापाचे रुग्ण आढळत आहेत. या तापाची लक्षणे ही सर्वसाधारण तापसारखीच असतात. माकडतापाची लागण होताच सुरुवातीला अंग मोडून ताप येतो. यासोबत अंगदुखीही सुरू होते. चार-पाच दिवसांनंतर ताप गेला तरी सांधेदुखी मात्र दीर्घकाळ कायम राहते. त्यामुळे अशक्तपणा येऊन रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. ही लक्षणे चिकुनगुन्यासदृश आहेत; मात्र तुलनेत या तापात थोडा कमी काळ ही लक्षणे आढळतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.