आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळांसाठी नियमावली:मास्क वापरा, कडी, दरवाज्यांना स्पर्श करू नका, स्वच्छता ठेवा; प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांनी केला होता शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ
  • ऑनलाइन, डिजीटल पद्धतीने देखील होणार सुरुवात

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षण विभागाने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. ‘रेड झोन’मध्ये नसलेल्या नववी, दहावी, बारावीच्या शाळा, महाविद्यालये जुलैपासून, इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून, इयत्ता तिसरी ते पाचवी सप्‍टेंबर, पहिली ते दुसरी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने तर इयत्ता अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.

शाळांनी 15 जून व 26 जूनपासून पुढील 2 आठवडे पूर्वतयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारिरिक अंतर राखणे शक्य व्हावे, याकरीता शाळा दोन सत्रांमध्ये सुरू करण्याचे नियोजन करावे. एक सत्र किमान तीन तासांचे असावे. पहिल्या सत्रात नऊ ते बारा व दुपारी 12 ते तीनपर्यंत किंवा एक दिवसाआड प्रत्येक सत्राचा कालावधी व वेळापत्रक ठरवावे. एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी, किंवा एका वर्गात जास्तीतजास्त 20 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी.

बैठक व्यवस्थेमध्ये किमान एक मिटर अंतर ठेवावे. शाळेच्या इमारतीत अतिरिक्त खोल्या असल्यास त्या स्वच्छ करून वापराव्यात. विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी साबन,पाणी यासारख्या सुविधा हात धुण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने उपलब्ध करून द्याव्यात. खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या बाबतीत शाळांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे. बसेस, ऑटोमध्ये मुलांची गर्दी होऊ नये, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने नियम ठरवावे. तसेच मुलांनी शाळेत पायी अथावा सायकलीने यावे किंवा पालकांनी त्यांना स्कूटर, सायकलने शाळेत सोडावे, अशा पर्यायाचा विचार होवू शकतो.

शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर पुढील कालावधीसाठी धान्य घरपोच द्यावे. सर्व विद्यार्थांना त्या त्या इयत्तांची शालेय वर्ष 2020-21 साठीची विषयनिहाय सर्व पाठ्यपुस्तके वाटप करण्याबाबतचे नियोजन करावे. भविष्यामध्ये कोरोना (कोव्हिड -19) चे रुग्ण आढळल्यास किंवा इतर कारणांमुळे शाळा बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत होणार नाही, यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन शाळांनी करावे. जे स्थलांतरीत मजूर गावी परत गेले आहेत, त्यांच्या मुलांना गावातील शाळेत प्रवेश, पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

घरात तयार केलेले मास्क वापरावे, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे, ज्या ठिकाणी वारंवार हात लावले जातात (उदा. दरवाजे, हॅंडल, खिडक्या) त्यांना स्पर्श न करणे, स्वच्छता व त्यासंबंधी विद्यार्थी, पालकांना माहिती देवून मार्गदर्शन करावे. मुलांनी स्वत:ची बॅग, पुस्तके, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य शाळेत येताना बरोबर घेऊन यावे.

बातम्या आणखी आहेत...