आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोळकर प्रकरण:दाभोळकर हत्या प्रकरणात यूएपीएसह या कलमांतर्गत गुन्हे दाखल करा, पुण्यातील कोर्टाचे आदेश; पुढील सुनावणी 15 सप्टेंबरला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे न्यायालयाने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील 4 आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 302, 120 (बी) तसेच यूएपीएच्या कलम 16 आणि 3 (25), 27 (1), 27 (3) अंतर्गत आरोप दाखल करण्याचे आदेश दिले आहे. पुढील सुनावणी आता 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी वकील आणि नातेवाईकांनी संपर्क साधण्यास मुदत देण्याची विनंती केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणात आता आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यासाठी 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. यापैकी तावडे, अंदुरे आणि कळसकर कारागृहात असून, पुनाळेकर आणि भावे जामिनावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...