आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटीलिया आणि मनसुख मर्डर केस:माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना NIA ने केली अटक, घरात आढळले स्फोटक प्रकरणासंबंधीत अनेक पुरावे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 पेक्षा जास्त एनकाउंटर करणारे देशातील पहिले पोलिस अधिकारी

अँटिलिया आणि मनसुख हत्या प्रकरणी बुधवारी नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (NIA)ने माजी ACP एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अटक केली आहे. अटकेपूर्वी अंदेरी ईस्टच्या भगवान भवन अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला आणि येथे अनेक तास शर्मांची चौकशी जाली. एक डझनपेक्षा जास्त संख्येत NIA चे लोक शर्मांच्या घराची झडती घेत आहेत. सूत्रांनुसार, शर्मांचा मोबाइल, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स NIA ने जप्त केले आहेत. शर्मांवर अँटिलिया केसमध्ये पुरावे मिटवणे आणि कटात सामिल होण्याचा आरोप आहे.

दरम्यान शर्माच्या घरी बुधवारी सकाळी छापेमारी करत NIA ने चौकशी सुरू केली आहे. एनआयए प्रदीप शर्मा आणि निलंबित API सचिन वझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे.

अनेक दिवसांपासून प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. सध्या राज्य राखीव दलाचे पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहे. प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रश्नांमधून समजून घ्या शर्मा-वझेमधील संबंध

शर्मा NIA च्या रडारवर का आले ?
सूत्रांनी सांगितल्यानुसार, NIA कडे प्रदीप शर्मा आणि सचिन वझेच्या मीटिंगची माहिती आहे. तपासादरम्यान एनआयएला माहिती मिळालीये की, मनसुख हिरेनच्या खूनाच्या काही दिवसांपूर्वी वझेने अंधेरी परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली होती. प्रदीप शर्मा त्याच भागात राहतात. वझे आणि शर्माची भेट झाल्याचा एनआयएला संशय आहे. एका CCTV फुटेजमध्ये वझे आणि शिंदे वांद्रे-वरळी सी लिंकवर कारमध्ये बसलेले दिसत आहेत. ते दोघे शर्माला भेटण्यासाठी जात असल्याचा संशय आहे. मनसुखला ज्या नंबरवरुन कॉल करुन बोलवण्यात आले होते, त्या नंबरचे शेवटचे लोकेशनही अंधेरीतील जेबी नगर होते.

NIA ला शर्माकडून काह माहिती हवीये ?
शर्मा आणि वझेची अखेरची भेट कधी झाली ? नोकरी सोडल्यानंतर शर्मा वझेच्या संपर्क होता का ? शर्मा-वझे-शिंदेची मीटिंग झाली का ? वझे आणि शिंदेने मनसुख हिरेनबाबत काही सांगितलं होतं का ? या प्रश्नांची उत्तरे एनआयएला शर्माकडून हवी आहेत.

वझे आणि शर्मामध्ये काय संबंध ?
2007 मध्ये निलंबित झाल्यानंतर वझेने शिवसेनेत प्रवेश केला होता. शर्माला शिवसेनेत एंट्री मिळण्याचे कारण वझेच आहे. पंरतु, 2008 नंतर वझेचे सदस्यत्व रिनीव्ह केले नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. प्रदीप शर्माला वझेचा गुरु मानले जाते.

35 वर्षे पोलिस विभागात कार्यरत
उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेले आणि नंतर धुळ्यात वाढेलल्या प्रदीप शर्मांनी 35 वर्षे पोलिस विभागात सेवा केली. प्रदीप शर्मा ठाण्यातील अँटी एक्सटॉर्शन सेलमध्ये कार्यरत होते. 90 च्या दशकात त्यांना मुंबई क्राइम ब्रांचमध्ये सामील करण्यात आले. त्या टीमला मुंबई अंडरवर्ल्डचा खात्मा करण्याची जबाबदारी दिली होती. तेव्हापासूनच शर्मांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख झाली. ​​​​​​आपल्या कार्यकाळात त्यांनी 112 एनकाउंटर केले. 100 पेक्षा जास्त एन्काउंटर करणारे ते देशातील पहिले पोलिस अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...