आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील एंटीलिया घराबाहेर स्कॉर्पियो गाडीत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. या घटनेच्या काही दिवसातच या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर आता हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्था (NIA)कडे देण्यात आले आहे. या प्रकरणात महाराष्ट्रा ATS देखील तपासकरत आहे. यावरुन आता परत केंद्र आणि राज्य सरकार आणने-सामने येण्याची शक्यता आहे. स्कॉर्पियो मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाराष्ट्र एटीएसने एफआयआदर दाखल केली आहे.
हिरेन यांच्या मृतदेहाच्या तपासादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर पाच रुमाल बांधण्यात आल्याचे दिसले. यावरुन ही आत्महत्या नसून, खून असल्याचा संशय बळावला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाता तपास NIA कडे सोपवण्याची मागणी केली होती. यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने तपास NIA कडे सोपवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.