आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • NIA Took Sachin Vaze To The Sweet River In Search Of Evidence, Computer CPU, Car's Number Plate Found From River

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:सचिन वाझेंसमोर NIA चा मीठी नदीत शोध, नदीत सापडल्या कॉम्प्यूटर CPU सह कारच्या 2 नंबर प्लेट

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचे कथित मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) रविवारी या प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिस विभागातील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक(API) सचिन वाझेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील मीठी नदीच्या पुलावर घेऊन गेले. एनआयएचे म्हणणे आहे की, सचिन वाझेने हार्ड डिस्क याच नदीत फेकून दिली आहे.

यावेळी नदीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी 12 पाणबुड्यांच्या मदतीने मीठी नदीत शोध घेतला. यावेळी मीठी नदीतून पाणबुड्यांना कॉम्प्यूटर CPU, लॅपटॉप आणि 2 नंबर प्लेट आणि इतर महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत
NIA ने सचिन वाझेंना कोर्टाच्या आदेशानुसार, तीन एप्रिलपर्यंत रिमांडवर घेतले आहे. वाझे कोर्टात म्हणाले होते, मला बळीचा बकरा बनवले जात आहे. तर, NIA च्या वकीलाने सांगितले की, वाझेंच्या घरातून 62 काडतूस जप्त करण्यात आली. हे काडतूस घरी कसे आले, याचे उत्तर वाझे देत नाहीयेत. याशिवाय, सरकारी कोट्यातून वाझेंना देण्यात आलेल्या 30 पैकी 25 काडतूस गायब आहेत, याचेही उत्तर वाझेकडे नाही.

बातम्या आणखी आहेत...