आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:'जे दिशा बरोबर झाले, तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो "शक्ती" कायदा काय चाटायचा आम्ही?' नितेश राणे आक्रमक

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्हेगार पर्यटनासाठी मंत्रालय एक नंबरवर- निलेश राणे

पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. भाजपने शिवसेनेच्या एका मंत्र्याचा यात हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अजूनच तापले. या प्रकरणावरुन भाजपने शिवसेनेला घेरायला सुरूवात केली आहे. भाजप नेते नितश राणे यांनी सोशल मीडियाद्वारे शिवसेनेवर जोरदार टीका केली.

राणे यांनी एक पोस्ट करुन शक्ती कायद्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'जे दिशा बरोबर झाले. तेच पूजा बरोबर होणार असेल. तर तो “शक्ती” कायदा, काय चाटायचा आम्ही?', असं म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला.

गुन्हेगार पर्यटनासाठी मंत्रालय सध्या एक नंबरवर- निलेश राणे

दरम्यान, नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनीदेखील शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 'पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. तुरुंग पर्यटन या सरकारने सुरू केलं आहे कुठेतरी वाचण्यात आलं पण जर एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर मंत्रालय सध्या एक नंबर वर आहे,' असे निलेश राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...