आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचा प्रहार:'आपल्याला टोपी लावून गेलेल्या अजित पवारांबद्दल काही बोलायचे नाही'-निलेश राणे

रत्नागिरी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बायका लपवणारे सुसंस्कृत का ?'

'आपल्याला टोपी लावून गेलेल्या अजित पवारांबद्दल काही बोलायचे नाही', असे म्हणत भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रत्नागिरीत माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राणे म्हणाले की, 'आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे शरद पवारांसोबत उभे केले जाते, तोच माणूस भाजपावर टीका करतो. देवेंद्र फणडवीस शपथविधीच्या पहाटे काय घडले ते अजून सांगत नाहीयेत, जर सांगितले तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही', असे टीकास्त्र राणेंनीनी सोडले.

बायका लपवणारे सुसंस्कृत का ?

यावेळी बोलताना राणे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. 'प्रॉपर्टी लपवणारे, बायका लपवणारे सुसंस्कृत का?, असा टोला निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना नाव न घेता लगावला. यासोबतच राणेंनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. 'संजय राऊत शेतकरी आंदोलकांना भेटायला गेले, मात्र कधी मराठा समाज्याच्या आंदोलकांना भेट दिली का?' असा सवालही राणेंनी उपस्थित केला.