आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:'खरा पुरुष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो'; निलेश राणेंचा अदित्य ठाकरेंवर घणाघात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात सुशांत सिंहचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणात अनेकांची नावे समोर येत आहेत. तसेच, विरोधकांकडून याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंचेही नाव घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अदित्य ठाकरेंवर घणाघात केला आहे. 'खरा पुरुष असशील तर राजीनामा दे', असे बोचरे ट्विट करुन राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते निलेश राणेंनी अदित्य ठाकरेंच्या अकाउंटचा फोटो शेअर करुन लिहीले की, 'शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो. '

सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर टीकेचे सत्र सुरु आहे. तसेच, सीबीआय चौकशीत अनेक मोठ्या व्यक्तींची नावे उलगडू शकतात त्यामुळे मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असून तपासासाठी वेळ घालवण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते. यातच आता, आदित्य ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मंत्री पदाचा उल्लेख काढल्याने, निलेश राणेंनी अदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.