आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:'थांबू नकोस मित्रा...'; शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर नितेश राणेंनी घेतली पार्थ पवारांची बाजू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्यावरुन नातू पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले. 'पार्थच्या बोलण्याला आम्ही कबडीचीही किंमत देत नाही', अशी प्रतिक्रीया शरद पवारांनी दिली. त्यावर आता भाजप आमदार नितेश राणेंनी पार्थ यांची बाजू घेतली आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवारांच्या प्रतिक्रीयेनंतर ट्वीट केले, 'आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!' दरम्यान, पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचे, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण सीबीआय चौकशीला माझा विरोध नाही.'

काय म्हणाले होते पार्थ ?

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. 'सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी', असे पार्त म्हणाले होते. आपल्या ट्विटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले होते.

बातम्या आणखी आहेत...