आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:'2024 ला तुझा बंदोबस्त करुन कोकणातून कायमचा बाहेर काढणार', निलेश राणेंचा विनायक राऊत यांना इशारा

सिंधुदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मातोश्रीवरचा थापा गेला आहे, आता हा नवीन थापा चप्पला उचलायची काम करतो'

भाजप नेते नारायण राणे यांच्यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंचे सुपूत्र निलेश राणे यांनी राऊत यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून धमकी वजा इशारा दिला आहे. राऊत यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे म्हणाले की, 'विनायक राऊत तुझी वेळ जवळ आली, 2024 ला तुझा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचं हद्दपार करणार.'

भाजप नेते नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरुन राऊत यांनी राणेंवर टीकास्त्र सोडे होते. 'एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल', अशी बोचरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. यानंतर निलेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे राऊत यांना एकेरी शब्दात धमकी वजा इशारा दिला.

निलेश राणे आपल्या व्हिडिओत म्हणतात की, नेहमीप्रमाणे बोलण्यासाठी विनायक राऊत बाहेर आला. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीच बाहेर येणार नाही, उलटी करायला, घाण करायला तो बाहेर आला. याने नारायण राणेंवर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. मुळात, हा स्वतः मोदी साहेबांच्या लाटेत दोनदा निवडूण आला. हिम्मत असेल, तर राजीनामा देऊन परत निवडणुकीत उभा रहा, पाहू किती मते मिळतात.'

'हा स्वतः नॉन मॅट्रीक आहे. याला दोन बायका आहेत, याची बाहेर घाणेरडी लफडी आहेत. खासदारकीचा एकही गुण याच्यात नाही. याच्या कुठल्याही बोलण्यात काही अर्थ नसतो. खासदार होण्याचा एकही गुण याच्यात नाही. मातोश्रीवरचा थापा गेला आहे, आता हा नवीन थापा असून तो चप्पला उचलायची काम करतो. तुझी वेळ आता जवळ आली, 2024 ला तुझा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचा बाहेर काढणार. यापुढे भाषा बदलली नाही, तर जिथे दिसशील तिथे फटके घालेन,' असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...