आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नीतेश राणे यांनी पलटवार केला आहे.
नीतेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर हल्ला केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नीतेश राणे यांनी म्हटले आहे की, 'लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना 'औरंग्यावरची' टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही'.
काय म्हणाले होते अजित पवार?
नितेश राणे यांनी यापूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, शरद पवारसाहेब कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत. राणेंनी केलेल्या या टीकेला अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले. अजित पवार म्हणाले होते की, 'टिल्ल्या लोकांनी असे काही सांगायचे कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते उत्तर देतील. असल्यांच्या नादी मी लागत नसतो.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.