आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्यावर मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाब सारखा देशद्रोहाचा खटला दाखल करून पाकिस्तानात पाठवण्यात यावे, असे ते म्हणालेत. ते कोल्हापुरात बोलत होते. ओबीसी समुदायाच्या नावाने चुकीचे बोलता. त्यानंतर संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यानंतर भाजपच्या नावाने बोंबा मारता, असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा
राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन देशाची बदनामी केली. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे, असे नितेश राणे शुक्रवारी सायंकाळी उशिरा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावाही केला. अनधिकृत धार्मिक स्थळे उभी करायची. त्यानंतर तिथे प्राणी कापून तेथील हिंदूंना पळवून लावण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे, असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचा जित्तूदिन असा उल्लेख
नितेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले - आमची लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी आहे. सर्व सामान्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी व्याख्यान व प्रबोधनाची मदत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण मुंब्र्याचा जित्तूदिन व अबू आझमी यांनी लव्ह जिहादची आकडेवारी खोटी असल्याचा असल्याचा आरोप करत आहेत.
लव्ह जिहाद विरोधी लढाई सोपी नाही
औरंगाबादचे नाव बदलल्यानंतर स्टेटसच्या माध्यमातून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही नितेश यांनी यावेळी केला. तुम्ही रक्ताची भाषा करणार असाल, तर आमच्याकडूनही रक्ताची भाषा होईल. राजकारण्यांना चौकटीत राहून बोलणे अडचणीचे ठरते. हिंदू समाज कुणावरही जबरदस्ती करत नाही. धर्मांतराविरोधात सुरू असणारी लढाई सोपी नाही. लव्ह जिहादच्या अनेक घटना उजेडात आल्या नाहीत, असे ते म्हणाले.
मुस्लिम तरुण हिंदू असल्याचा बनाव करून हिंदू तरुणींशी लग्न करतात. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र लव्ह जिहादमुक्त केल्याशिवाय थांबणार नाही. महाराष्ट्रात सर्वात कठोर धर्मांतरविरोधी कायदा आपल्याला पहायला मिळेल, असे नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंधित खालील बातम्या वाचा...
राजकीय गुरू:माझ्या वाटचालीत अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोलाचा वाटा, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची स्पष्टोक्ती
आपल्या राजकीय जडणघडणीत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विद्यमान भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे विचार करणारे आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाईल, असे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
भाजपवर हल्लाबोल:चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, देशात अमृतकाल नव्हे आतंककाल वाटावा, अशी स्थिती; ठाकरे गटाची टीका
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखविला आहे. चोरांना चोर म्हटले, हा काय गुन्हा झाला?, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
एकाही चोरावर अद्याप कारवाई नाही
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीरव मोदी व ललित मोदी यांना चोर म्हटले व संपूर्ण देश आज अदानी यास चोर म्हणत आहे. त्यापैकी एकाही चोरावर अद्याप कारवाई होऊ शकलेली नाही, पण सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली असेल तर कलम 500 अंतर्गत असा खटला दाखल करता येतो. ज्या व्यक्तीबद्दल भाष्य केले त्या व्यक्तीनेच खटला दाखल केला पाहिजे. एखाद्या समूहाबद्दल भाष्य असेल तर ती व्यक्तिगत बदनामी ठरत नाही. पण सुरत प्रकरणात नीरव, ललित व नरेंद्र मोदींवर भाष्य केले असताना चौथाच मोदी उपटला व त्याने मोदींची बदनामी झाली, असे सांगून मानहानी खटला दाखल केला. गुजरातच्या न्यायालयाने तो मान्य केला व राहुल गांधी यांना गुन्हेगार ठरवले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.